Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: पाच लाखाची लाच; गटविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Jalgaon News : चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो. त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील

Rajesh Sonwane

जळगाव : दिवाळीच्या सुट्या असताना या काळात लाच घेण्याचा प्रकार उघड झाला आहे. चौकशीतून (Bribe) मुक्त करण्यासाठी तब्बल पाच लाखाची लाच स्वीकारताना (Jalgaon) जळगाव पंचायत समितीतील येथील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. (Breaking Marathi News)

दिवाळीनिमित्ताने सर्वच शासकीय कार्यालयांना सुट्या आहेत. पाडव्याची सुटी असताना पाडव्याच्याच दिवशी शासकीय कार्यालयात एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. जामनेर तालुक्यातील तक्रारदार हे लोकसेवक असून त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये (Jalgaon ACB) आरोपी तथा विस्तार अधिकारी सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी अधिकारी असलेले रवींद्र शालिग्राम सपकाळे (वय ५४) व विस्तार अधिकारी बुधा अहिरे (वय ५३) हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो. (ACB) त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुटीच्या दिवशी यघडले कार्यालय 
लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुट्टीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना लाचखोरांनी पंचायत समितीचे कार्यालय उघडून तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाच घेताच तक्रारदाराने इशारा केल्यावर एसीबीने लाचखोरांना अटक केली. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

Thursday Horoscope : हवे तसे यश मिळेल, ५ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

Monsoon Update: राज्यासाठी पुढचे ४ ते ५ दिवस महत्वाचे, पाऊस धुमाकूळ घालणार; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे हादरलं ! एका घरात आढळले आईसह दोन मुलांचे मृतदेह

SCROLL FOR NEXT