Jalgaon Bribe Case
Jalgaon Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe: वीजबिल कमी करण्यासाठी अभियंत्याच्या नावे लाच

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात साई सर्व्हिसेस नावाच्या गॅरेजवर महावितरण विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला होता. वाढीव वीजबिल कमी करून देण्यासाठी महावितरण (MSEDCL) अभियंता पाचंगे यांच्या नावाने लाच (Bribe) मागणाऱ्या संशयित ‘पंटर’ला अटक करून गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Bribe News)

लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक (Jalgaon) वसाहत परिसरातील साई सर्व्हिसेस नावाच्या कार दुरुस्ती गॅरेजमध्ये विद्युत मिटरमध्ये संक्शन लोड २५ केडब्लू असताना वीजबिल केवळ २ केडब्लू प्रमाणे येत असल्याचे व्हिजीलन्स विभागाच्या पथकाने छापामारुन पंचनामा केला हेाता.

लेखी तक्रार

कारवाई टाळण्यासाठी व निर्धारीत विजभार कमी करून देण्यासाठी अभियंता पाचंगे यांच्या नावाने अनिल सुधाकर सासनिक (वय ३५, रा. श्रद्धा कॉलनी) याने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली हेाती. तक्रादाराने लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रार केल्यावरुन लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेश सिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे यांच्या पथकाने सापळा रचून अनिल याला तक्रारदाराकडून लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

SCROLL FOR NEXT