Suicide
Suicide Saam tv
महाराष्ट्र

मूलबाळ होत नसल्याने क्रूर वागणूक; विवाहितेची आत्महत्या

साम टिव्ही ब्युरो

बोदवड (जळगाव) : येथे विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना नीलेश महाजन (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. (jalgaon news bodwad women suicide on no child and family torture)

बोदवड (Bodwad) येथील गोरक्षनाथनगरमधील भावना महाजन यांच्या पत्नीने सोमवारी (ता. २१) राहत्या घरी सकाळी साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. भावना व नीलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नव्हते. या कारणावरून पती व चुलत सासरे व सासू यांनी मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याने आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून भूषण अशोक माळी (रा. असोदा) यांच्या फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा. गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीसह चुलत सासू– सासरे अटकेत

बोदवड येथे शवविच्छेदनासाठी महिला डॉक्टर नसल्याने मृत विवाहितेची जळगाव (Jalgaon) येथे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह असोदा येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Speed : हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल प्रवास अधिक वेगवान होणार, मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय

PM Modi: उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा; पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा

Raj Thackeray: महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं पहिलं रील; राज्यातील लोकांना केलं मोठं आवाहन

Morning Tips: सकाळची 'ही' सवय ठरते आरोग्यासाठी फायदेशीर,जाणून घ्या

Today's Marathi News Live : सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून कारवाईची शक्यता

SCROLL FOR NEXT