Jalgaon News Eknath Khadse
Jalgaon News Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: खडसेंचे कार्यकर्ते फुटून चंद्रकांत पाटलांकडे; शिंदे गटात झाले सहभागी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव जिल्ह्यात बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावात एकनाथ खडसेंना धक्‍का बसला आहे. खडसेंच्‍या बालेकिल्‍ल्‍यातील (NCP) राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. (Jalgaon News Eknath Khadse Chandrakant Patil)

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नेतृत्वात बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला होता. तर दोन दिवसांपूर्वी रावेर (Raver) तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झेंडा फडकावला. परंतु, काही दिवसातच खडसेंना धक्‍का बसला आहे.

रावेर तालुक्‍यातील ग्रामंपचायत निवडणूकीत चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत शिंदे गटाला धक्‍का दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे येथील वर्चस्व सिध्द झाले. मात्र ग्रामपंचायतीच्‍या निकालाच्‍या दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसेंचे राष्‍ट्रवादीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत धक्‍का दिला आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: २० वर्षांनी 'राज'योग! ठाकरे-नारायण राणे २ दशकांनंतर एकाच व्यासपीठावर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Today's Marathi News Live : कुणाला मालक होऊ देऊ नका मी तुमचा सेवक आहे: संजय पाटील

Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

SCROLL FOR NEXT