Rashi Parivartan Effect: गुरुचे बळ वाढलं; २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मालामाल होण्याची संधी

Guru Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ही शुक्राच्या स्वामित्वाची रास आहे. शुक्र हा धन, वैभव व संपत्तीचा कारक मानला जातो तर गुरु हा बुद्धी, बळ, शांतीचा ग्रह मानला जातो.
Rashi Parivartan Effect
Rashi Parivartan Effectyandex

एप्रिल २०२३ मध्ये गुरूने मेष राशीत प्रवेश केला होता त्यानंतर आता तब्बल ३७४ दिवसांनी गुरूच गोचर करून वृषभ राशीत स्थित झालेत. हे गोचर १ मे ला गुरुचे वृषभ राशीतील गोचर पार पडले. यंदाच्या गोचरनंतरही गुरू ग्रह संपूर्ण वर्षभर वृषभ राशीत स्थित असतील. म्हणजेच २०२५ पर्यंत काही राशींना गुरूचा तगडा प्रभाव अनुभवायला मिळेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ ही शुक्राच्या स्वामित्वाची राशी आहे. शुक्र हा धन, वैभव व संपत्तीचा कारक मानला जातो तर गुरु हा बुद्धी, बळ, शांतीचा ग्रह मानला जातो. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाने काही राशींना मोठा लाभ होणार आहे.

वृषभ

या गोचरमुळे काहीच्या वैवाहिक जीवनातील गोडवा वाढू लागेल. या राशीच्या आर्थिक मिळकतीला जुन्या गुंतवणुकीची जोड मिळू शकते.अनेकांच्या घरात लक्ष्मी मातेचं आगमन होईल. आर्थिक फायदे वाढण्यासह खर्चाचे आकडे सुद्धा वाढू शकतात. ही बाब या राशीतील लोकांनी लक्षात घ्यावी. तुम्हाला स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्त्वाचं आहे.

कन्या

गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केल्याने कुबेर योग निर्माण होणार आहे. यामुळे अनेकांची अडकून पडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. एक एक काम मार्गी लागत असताना त्यातून प्राप्त होणाऱ्या धनाचे प्रमाणही वाढीस लागेल. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. करिअरमध्ये प्रगती मिळवून देणारं एखादं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्याकडे सोपवलं जाईल. कामाच्या निमित्ताने परदेशात प्रवासाचे योग निर्माण होतील.

सिंह

या राशीलासुद्धा कुबेर योग लाभणार आहे. या राशीतील व्यापारी वर्गाला एखादी विदेशात व्यवहार होण्याची शक्यता आहे. तसेच जोडीदारासह चालू असणारे हेवेदावे भांडणे काळात दूर होतील. गुरू आणि शुक्राच्या प्रभावाने अनेकांच्या मनाला शांती मिळेल.

Rashi Parivartan Effect
Budh Gochar 2024: १० मे नंतर 'या' तीन राशींना होणार धनलाभ; बुध देव करणार करोडपती होण्याचा आशीर्वाद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com