Budh Gochar
Budh Gochar google

Budh Gochar 2024: १० मे नंतर 'या' तीन राशींना होणार धनलाभ; बुध देव करणार करोडपती होण्याचा आशीर्वाद

Budh Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये राजकुमार मानलं जातं. बुध ग्रह बुद्धी, मन आणि चंचलता प्रदान करणार ग्रह आहे. बुध ग्रह एका महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध देव काही दिवसानंतर बुध देव म्हणजेच ग्रह राशी संक्रमण करणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचे नशीब पलटणार आहे. यासह त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळेल.

वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला सर्व ग्रहांमध्ये राजकुमार मानलं जातं. बुध ग्रह बुद्धी, मन आणि चंचलता प्रदान करणार ग्रह आहे. बुध ग्रह एका महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करत आहे. दुसऱ्या राशीत जात असल्यामुळे इतर राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह ९ एप्रिल रोजी मीन राशीच्या घरात गेले होते. आता १० मे रोजी बुध ग्रह मीन राशीच्या घरात बाहेर पडत मेष राशीच्या घरात प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं हे संक्रमण खूप लाभकारी असणार आहे. कारण धनु राशीत बुध ग्रह पाचव्या भाव घरात संक्रमण करतील. यामुळे या राशीमधील पालक मंडळींना त्यांच्या मुलांकडून काही नवीन बातमी मिळणार आहे. अनेकांना आर्थिक लाभ होईल. ज्या लोकांना राजकारणात जायचं असेल त्यांच्यासाठी हा काळ लाभकार आहे. राजकारणात करिअर बनवण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांची मोठ्या राजकीय लोकांशी भेट होणार आहे.

मकर राशी

मकर राशीमधील लोकांसाठी सुद्धा बुध ग्रहाचे संक्रमण लाभकारी असणार आहे. कारण बुध देव मकर राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये चतुर्थ घरात भ्रमण करणार आहेत. तसेच बुध ग्रह मकर राशीच्या सहाव्या आणि नवव्या घरात स्वामी आहेत. यामुळे या राशीतील लोकांचं नशीब पलटणार आहे. त्यांना आर्थिक लाभ होणार असून ते नवीन घर,वाहन खरेदी करू शकतात.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे परिवर्तन चांगले असणार आहे. कारण कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध करिअर आणि व्यवसायाच्या घरामध्ये संक्रमण करणार आहेत. अशा परिस्थितीत, व्यक्तीला त्याच्या कामात आणि व्यवसायात आश्चर्यकारक नफा मिळेल. तसेच प्रत्येक कामात त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळेल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Budh Gochar
Guru Rashi Parivartan : 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com