Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये पुन्हा ट्विस्ट, शांतिगिरी महाराजांसह ६ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध, पण...

Maharashtra Lok Sabha Election : नाशिकमधून सहा तर, दिंडोरीमधून पाच उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यात शांतीगिरी महाराजांचाही समावेश आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट आला आहे. शांतीगिरी महाराज, अनिल जाधव आणि भक्ती गोडसे यांच्यासह सहा जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर दिंडोरीमधून पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.

शांतीगिरी महाराजांनी शिवसेना, अनिल जाधव यांनी भाजप, तर भक्ती गोडसेंनीही शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरले होते. एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाले, तर अपक्ष म्हणून उमेदवारी कायम आहे. अर्ज छाननीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एकूण अकरा ११ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com