Bodwad Nagar Panchayat saam tv
महाराष्ट्र

Bodwad Nagar Panchayat Results: एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का

एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का

संजय महाजन

जळगाव : बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणी सुरू असून आतापर्यंत बारा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात एकनाथ खडसेंना धक्‍का असून राष्ट्रवादीला 7, शिवसेनेला (Shiv Sena) 9 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला (BJP) आतपर्यंत एका ठिकाणी विजय मिळाला आहे. (jalgaon news bodwad nagar panchayat election result Eknath Khadse hit on his own home ground)

बोदवड नगरपंचायतीसाठी (Bodwad Nagar Panchayat Elections 2022 Result) सुरू असलेल्या मतदानाची मोजणी आज सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ झाली. पहिल्‍या फेरीपासून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आघाडी ठेवली होती. बोदवडमध्‍ये सत्‍ता असलेल्‍या भाजपला मात्र केवळ खाते उघडता आले आहे. मात्र मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलवली. यात राष्‍ट्रवादीला मागे टाकत शिवसेना पुढे गेली आहे.

चंद्रकांत पाटीलांकडून खडसेंना धोबीपछाड

बोदवड नगरपंचायतीच्‍या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार १७ पैकी राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर विजय मिळविता आला आहे. विशेष म्‍हणजे राष्ट्रवादीने १७ पैकी १७ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, शिवसेनेने आतापर्यंतच्‍या निकालात मुसंडी मारल्‍याने एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का बसल्‍याचे चित्र सध्‍यातरी आहे.

बोदवड नगरपंचायत

एकुण जागा-17

भाजप- 1

शिवसेना-9

काँग्रेस-0

राष्ट्रवादी-7

इतर(अपक्ष)-०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT