Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: राज्यपाल, भाजप नेत्यांविरोधात रास्ता रोको

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याबद्दल वादग्रस्‍त वक्‍तव्‍य राज्‍यपाल व भाजपच्‍या (BJP) नेत्‍यांनी केले आहे. या विरोधात जळगावात (Jalgaon) विविध पक्षाच्‍या कार्यकत्‍र्यांनी राष्‍ट्रीय महामार्गावर रास्‍ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतुक विस्‍कळीत झाली होती. (Maharashtra News)

राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी व भाजप नेत्‍यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केले आहे. यामुळे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई– नागपूर (Nagpur) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बांभोरी येथील गिरणा नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. पुलावरच आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.

पोलिस स्‍टेशनमध्‍ये घोषणाबाजी

आंदोलनाच्‍या आयोजक लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांना पोलिसांनी अडवले. तर काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्थानकात आणले असता तेथे जोरदार घोषणाबाजी करून राज्य व केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT