जळगाव : शहरातील मेहरूणमधील रहिवासी व विद्यापीठातील कंत्राटी कामगाराची हत्या (Crime News) करण्यात आली. प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३) असे मृताचे नाव आहे. तो शनिवारी (ता. ११) दुपारी चारला विद्यापीठातून निघाल्यापासून बेपत्ता होता. (Tajya Batmya)
जळगाव (Jalgaon) तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घनकचरा प्रकल्पाजवळच रेल्वे ट्रॅक आहे. तेथे नदीच्या दिशेने गेल्यावर बाभळीच्या जंगलात महादेवाचे मंदिर असून तेथे सहसा कोणी येत नाही. या दुर्गम परिसरात एखादा महादेव भक्त येतो; नाही तर वाळूमाफिया, गर्दुल्ले यांचाच वावर असतो. निर्मनुष्य ठिकाणी सोमवारी सकाळी साडेदहाला आव्हाने येथील पोलिसपाटील पिंटू कोळी यांना गुराख्याने मृतदेह आढळून आल्याचे सांगितले. याबाबत मिळालेल्या माहितीवरून तालुका (Police) पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गणेश रायकर, नयन पाटील, हरिलाल पाटील, लिलाधर महाजन, संजय भालेराव, दीपक कोळी यांनी घटनास्थळाकडे गेले.
ड्युटीवरून परतताना घात
महादेव मंदिराजवळच जिन्स पँट शर्ट घातलेल्या व कुजलेला मृतदेह आढळून आला. जवळच दुचाकी आढळून आली. दुचाकीच्या डिक्कीत विद्यापीठाचे ओळखपत्र सापडले. नंतर पोलिसांनी संबंधितांशी संपर्क करून मृतदेहाची ओळख पटविली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद शनिवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला हेाता. दुपारी चारला विद्यापीठातून ड्यूटी संपल्यावर तो घराकडे येण्यासाठी निघाला. मात्र, घरी पोचलाच नसल्याने पत्नी मोहिनीसह कुटुंबियांनी मोबाईलवर संपर्क केला. मात्र, मोबाईल बंद येत असल्याने एमआयडीसी पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंदविली.
१५ ते २० शस्त्राचे वार
प्रमोद शेट्टी अंगाने मजबूत व साडेपाच फुट उंचीचा होता. त्याचा गळा चिरण्यात आला होता. त्याचे हात, पाठ आणि मांड्यांवर तीक्ष्ण हत्याराने खोलवर वार करण्यात आले आहेत. त्यानंतर दगडाने डोके ठेचण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळून आले. त्याच्यावर सहजासहजी नियंत्रण मिळवणे अशक्यच असल्याने एकपेक्षा जास्त मारेकऱ्यांचा यात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.