Girish mahajan 
महाराष्ट्र

दुष्‍काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : आमदार महाजन

दुष्‍काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : आमदार गिरीश महाजन

संजय महाजन

जळगाव : जळगावच नव्‍हे तर धुळे व नंदुरबार जिल्‍ह्यात यंदा पाऊस झालेला नाही. आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्‍केच पाऊस झालेला आहे. यामुळे शंभर टक्‍के पिकांचे नुकसान झाले आहे. याकरीता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच खानदेशात दुष्‍काळ जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. (jalgaon-news-bjp-leader-girish-mahajan-later-in-collector-Give-full-support-to-farmers-by-declaring-drought)

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासाठी भाजपतर्फे आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री आमदार गिरिश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन दिले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा

जिल्‍ह्यात यंदा पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. आता पाऊस आला नाही तर पुढे जावून पाण्याचा प्रश्‍न गंभीर होईल. यामुळे हे संकट टाळण्यासाठी राज्‍य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा. कारण आता ढगाळ वातावरण असून त्‍याचा फायदा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी होईल; याकरीता लवकरात लवकर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची मागणी महाजन यांनी केली आहे.

झंवर सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय : महाजन

बीएचआर प्रकरणात अटक करण्यात आलेले सुनील झंवर हे सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय आहे. कुणी नाही म्हणून दाखवावे? असे स्‍पष्‍टीकरण आमदार गिरीश महाजन यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रकाशा बॅरेजची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू

Child Safety Alert : कफ सिरप प्यायल्याने ६ चिमुकल्यांचा मृत्यू; २ औषधांवर तात्काळ बंदी, धक्कादायक कारण समोर

Rakhi Sawant: 'डोनाल्ड ट्रम्प माझे खरे बाबा', आईनं शेवटच्या पत्रात लिहिलं होतं...; राखी सावंत पुन्हा बरळली

Chilli Burn Relief: हिरवी मिरची चिरल्यावर हात जळतात? 'हे' घरगुती सोपे उपाय करून आराम मिळवा

Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

SCROLL FOR NEXT