Jalgaon Bajar Samiti Election Saam tv
महाराष्ट्र

Bajar Samiti Election: शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची आरोप; अपक्ष उमेदवाराकडून केंद्रावर राडा

शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याची आरोप; अपक्ष उमेदवाराकडून केंद्रावर राडा

संजय महाजन

जळगाव : कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीसाठी आज मतदानाची प्रक्रीया पार पडत आहे. यात जळगाव (Bajar Samiti Election) कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीसाठी जळगाव (Jalgaon) शहरातील मतदान केंद्रावर शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्‍याचा आरोप अपक्ष उमेदवाराने करत राडा घातला. (Tajya Batmya)

जळगाव जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत आज मतदान पार पडत आहे. सकाळपासून मतदानाच्‍या प्रक्रीयेला सुरवात झाली असून मतदान केंद्रावर पोलिस (Police) बंदोबस्‍त देखील लावला आहे. जिल्‍ह्यातील काही केंद्रावर मतदानाची प्रक्रीया शांततेत ‍पार पडत आहे. परंतु, काही केंद्रावर गोंधळ उडाल्‍याचे पहावयास मिळाले. यात जळगावातील केंद्रावर बोगस मतदान होत असल्‍यसाचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून झाला आहे.

मतदान प्रक्रीया बंदची मागणी

जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर राडा झाल्‍याचे पहावयास मिळाले आहे. त्यात शिंदे गटाकडून (Shinde Group) बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत अपक्ष उमेदवाराने थेट मतदान केंद्रात राडा घातला. तसेच मतदान प्रक्रीया बंद करावयाची मागणी देखील केली. परंतु, पोलिसांनी मध्‍यस्‍थी करत वाद टाळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera Cookies Recipe: संध्याकाळच्या चहासोबत खायला बनवा खुसखुशीत जिरा कुकीज; रेसिपी लगेच करा ट्राय

Maharashtra Live News Update: बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र

Hair Care: केस गळतीच्या समस्या अन् चेहऱ्यावरचे मुरुम सगळेच होतील छुमंतर, वापरा फक्त हे ४ दाणे

Manoj Jarange : मनोज जरांगेंना गोळ्या घालणार, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग...

Latur Crime: आयकर अधिकाऱ्याची मुलाने केली हत्या, पोटात चाकू भोसकला; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT