Ravalgaon sugar factory 
महाराष्ट्र

जप्त साखरेचा लिलाव टळला; ‘रावळगाव'कडून थकीत रक्कम जमा

जप्त साखरेचा लिलाव टळला; ‘रावळगाव'कडून थकीत रक्कम जमा

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : ऊस उत्पादकांच्या थकीत रकमेप्रकरणी मालेगाव येथील रावळगाव साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश देत मालमत्ता सील करून साखरेचा लिलाव करण्यात येणार होता. मात्र लिलावाला अपेक्षित शासकीय रकमेची बोली न मिळाल्याने तो तूर्त टळला आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रावळगाव कारखाना प्रशासनाकडून २०२०-२१ मधील थकीत एफआरपी रक्कम टप्प्याटप्प्याने अदा करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकी एक हजार रुपये हप्ता असे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. आतापर्यंत तीन टप्प्यात ही रक्कम अदा केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम १५ टक्के व्याजासह मिळणार आहे. (jalgaon-news-Auction-of-confiscated-sugar-avoided-Deposit-amount-from-Rawalgaon-sugar-factory)

थकीत रकमेप्रकरणी रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याची जंगम व स्थावर जप्त करून थकीत रकमेची वसुली करावी असे आदेश नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी तहसीलदारांना दिले होते. चाळीसगाव तालुक्यातील बाळासाहेब देवकर, अशोक पाटील, तुकाराम पाटील प्रदीप कच्छवा, वनसिंग पाटील, कृष्णराव देशमुख, चेतन देशमुख, बापूराव पाटील व भडगाव तालुक्यातून खाही शेतकरी मिळून जवळपास पन्नास हजार मेट्रिक टन ऊस या साखर कारखान्याला दिला होता.

अपेक्षित बोली नाही...

आमदार मंगेश चव्हाण यांनीही थेट अलिबाग गाठत कारखाना मालकाची भेट घेत शेतकऱ्यांची थकीत रकम देण्याची मागणी केली होती. तिचा दखल घेत साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यास नोटीसही बजावली होती. सूचना देऊनही रावळगाव कारखान्याकडे २०२०-२१ हंगामातील एफआरपीची रक्कम १७ कोटी ९८ लाख 76 हजार रुपये थकीत असल्याने कारखान्याची मालमत्ता सील करण्याचे निर्देश दिले होते. मोलॅसिसच्या लिलावात कुणीही भाग घेतला नाही. साखर व बगॅसचा लिलावात साखरेचा दर ३१०० रुपये असा असताना २९५२ रुपयांपेक्षा जास्त बोली कोणी लावली नाही. यामुळे लेखा परीक्षकांच्या सल्ल्याने लिलाव स्थगित करण्यात आला.

खात्यावर थकीत रक्कम जमा

दुसरीकडे कारखान्याची मालमत्ता सील करण्यात आल्याने धास्तावलेल्या कारखाना प्रशासनाने गळीत हंगामातील थकीत एफआरपी रक्कम टप्प्याटप्याने अदा करण्यास २१ जूनपासून सुरुवात केली.१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ ची देय रक्कम अदा केली. एक जुलैला ५८ लाख २४ हजार २४५ रुपये अदा केले आहेत. २ ऑगस्टला दोन कोटी ५ लाख ४५ हजार ३४७ रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. उर्वरित थकीत एफआरपी रक्कम लवकरच टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कारखान्याने साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Travel : फ्रेंड्स सोबत विकेंडला मुंबईतील या फेमस जागांवर नक्कीच फिरा

Copper bottle: तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? पाहा नेमकी कशी वापरावी ही बाटली?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील ३०,००० महिलांचे अर्ज बाद

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील हिरकणी कक्ष कायम बंद

Who Is Mahika Sharma: हार्दिक पांड्यामुळे चर्चेत आलेली माहिका शर्मा कोण आहे?

SCROLL FOR NEXT