महाराष्ट्र

धक्‍कादायक..नात्‍याला काळीमा, बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्‍कादायक..नात्‍याला काळीमा, बापाकडूनच अत्याचार अल्पवयीन मुलीवर

साम टिव्ही ब्युरो

भुसावळ (जळगाव) : खुद्द जन्मदात्या पित्यानेच आपल्या १६ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. संयमाचा बांध फुटल्याने या छळाविरुद्ध पीडित मुलीने नराधम बापाविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.

शहरातील पीडित १६ वर्षीय मुलीच्या आईचे १३ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे ती आपले वडील, आत्या व भावासह राहते. लहानपणापासून आत्यानेच या पीडित मुलीचा सांभाळ केला आहे. दरम्यान, पीडितेचा ४१ वर्षीय पिता गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. याबाबत कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पहाटे अतिप्रसंगाचा प्रयत्न

शनिवारी (ता. २३) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान पीडितेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडितेने विरोध करीत बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले व पोलिसांकडे आपल्यावर घडलेली आपबिती सादर केली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पीडितेचे म्हणणे ऐकून घेत तातडीने गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भागवत यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये बुध, मंगल आणि शुक्र ग्रह बदलणार चाल; 'या' 3 राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Ganeshotsav Bus : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, गणेशभक्तांच्या बसचा आधी टायर फुटला; नंतर पेट घेतला, क्षणात...

Xiaomi Redmi Note 15 Pro लाँच, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

SCROLL FOR NEXT