Child Marriage saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; आता तीन महिन्यांची गर्भवती

अल्पवयीन मुलीचे लावले लग्न; आता तीन महिन्यांची गर्भवती

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील जुन्‍या जळगाव परिसरातील अल्पवयीन मुलगी असल्याची जाणीव असतांना तिचे लग्न लावून देण्यात आले. अल्‍पवयीन असल्‍याने मुलीची मानसिक व शारिरीक तयारी नसतांना पतीकडून शरीरसंबंध राहिल्याने ती गर्भवती राहिल्याने प्रकरणाचा उलगडा होवुन शनिपेठ पोलिसांत (Police) या प्रकरणी गुन्ह्याची नेांद करण्यात आली आहे. (jalgaon news Arranged marriage of a minor girl Now three months pregnant)

शालेय शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शहरातील जुने जळगाव (Jalgaon) परिसरातील विठ्ठलपेठ भागात वास्तव्यास आहे. शिक्षण घेण्याच्या वयातच आई व मामाने तिचा विवाही जुळवून आणला. मुलीच्या शरीराची योग्यती वाढ झाली नसतांना ६ जुन २०२१ रेाजी तिचा जामनेर (Jamner) तालूक्यातील साहिल बशीर तडवी या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला. मुलगी अल्पवयीन असतांना कुटूंबीयांनी शाळा सोडवुन तिचा बळजबरीने विवाह लावुन दिला.

तपासणीत डॉक्‍टरांच्‍या आली बाब लक्षात

तसेच मुलाला व त्याच्या (Child Marriage) कुटूंबीयांनाही ती अल्पवयीन असल्याची जाणीव असतांना कुठलाही विरोध न होता लग्न होवुन पिडीतेची बिदाई झाली. पतीने वारंवार शरीरसंबध ठेवल्याने पिडीता गर्भवती राहिली. पिडीतेला उपचारार्थ घेवुन गेल्यावर डॉक्टरांच्या लक्षात हि बाब आल्याने प्रकरण उघडकीस आले. बाल कल्याण समिती समक्ष मुलीचे जाब-जबाब नोंदवण्यात आले. पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिपेठ पेालिस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला बाशीर तडवी, सासरे बाशीर तडवी, चुलत मावशी आरीफा तडवी, मुलाचा मामा यांच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

SCROLL FOR NEXT