Marathi Sahitya sammelan Saam TV
महाराष्ट्र

Marathi Sahitya Sammelan: अखेर ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेरमध्ये होणार; पुण्यातील बैठकीत शिक्कामोर्तब

97th Marathi Sahitya Sammelan: ९७ वे साहित्य संमेलन साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार आहे..

Prachee kulkarni

Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनाविषयी एक मोठी बातमी समोर येत असून ९७ वे संमेलन जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. आज झालेल्या साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यामधून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Marathi Sahitya Sammelan) महामंडळातर्फे स्थळनिवड समिती करण्यात आली होती. यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक श्री. प्रदीप दाते, यांचा समावेश होता.

या बैठकीत साहित्य संमेलनस्थळाची निश्चिती झाली असून 97 वे साहित्य संमेलन यंदा साने गुरुजींच्या भूमीत म्हणजेच जळगावच्या अमळनेरमध्ये भरणार आहे.

अमळनेरमध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन...

जळगाव जिल्ह्यात याआधी १९३६ मध्ये संमेलन झाले होते. माधव त्रिंबक पटवर्धन त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. १९५२ मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेर शहरात दुसऱ्यांदा हे संमेलन होत आहे. जळगाव शहरात १९८४ मध्ये संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षस्थान शंकर रामचंद्र खरात यांनी भूषविले होते. म्हणजेच १९८४ आता हे संमेलन जळगाव जिल्ह्यात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवनेरी एसटी आता मराठवाडा, विदर्भातही धावणार

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Homemade Cake Recipe : गव्हाच्या पीठापासून बनवा बेकरी स्टाइल केक, फॉलो करा 'या' स्टेप्स

Farmer : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ई-पीक पेरा नोंदणीत मिळाला दिलासा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT