Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: भाजपतर्फे अजित पवार यांच्‍या विरोधात आंदोलन; प्रतिमेला मारले जोडे

भाजपतर्फे अजित पवार यांच्‍या विरोधात आंदोलन; प्रतिमेला मारले जोडे

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे स्वराज्यरक्षक होते; असे वक्‍तव्‍य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. याचा निषेध करत (BJP) भाजपने अजित पवार यांच्‍या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले. (Breaking Marathi News)

भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. आंदोलनात महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यामोठ्या संख्येने उपस्थित होत्या.युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

अजितदादांनी इतिहास वाचावा

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही, ते स्वराज्य रक्षक असल्‍याचे वक्तव्य केले आहे. परंतु, धर्मवीर हा त्यांचा इतिहास आहे. यामुळे अजितदादांनी इतिहास वाचावा. इतकी वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मवीर म्हटले जात आहे. हा इतिहास खोटा ठरविण्याचे काम पवार घराण्यांनी केला असल्‍याचे आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow Saree Designs: हळदीला नेसा पिवळ्या रंगाची साडी, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Matar Paratha Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी मटार पराठा, वाचा सोपी रेसिपी

Liver damage symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा लिव्हर हळूहळू होतंय खराब

Cancer Tests: कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखून करा 'या' चाचण्या, नाहीतर...; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Dagadu Sapkal: मोठी बातमी! मतदानाच्या ४ दिवसआधी ठाकरेंना जबरी धक्का, मुंबईतील माजी आमदार दगडू सपकाळ शिंदेसेनेत

SCROLL FOR NEXT