Anil Patil Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Anil Patil Statement : संपूर्ण राष्ट्रवादी आमच्याकडे असेल यात नवल वाटायला नको; मंत्री अनिल पाटील यांचा दावा

संजय महाजन

जळगाव : वाट बघा सध्या आम्ही ४४ प्लस आहोत. काही दिवसांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमच्याकडे असेल; असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच मंत्री अनिल पाटील (Anil Patil) जळगावात दाखल झाले. (Tajya Batmya)

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गट बाहेर पडून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी किती आमदारांचा पाठिंबा अजित पवार गटाला आहे. याबाबत (Jalgaon) सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याविषयी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद अनिल पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलेले आहे.

जळगाव स्टेशनवर जल्‍लोषात स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी नुकताच शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचाही समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकीत अनिल पाटील अमळनेर मतदारसंघातून निवडून येत पहिल्यांदाच आमदार झाले आणि कॅबिनेट मंत्रिपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. मंत्री झाल्यानंतर अनिल पाटील हे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याने अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांचं जळगाव स्टेशनवर फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्वागत केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासोबत मंत्री अनिल पाटील यांनी ठेका धरला. दरम्यान, मंत्री पाटील हे जळगावहुन सकाळी 9 वाजेला त्यांच्या अमळनेर मतदारसंघाकडे रवाना होणार आहेत. अमळनेरकडे जाताना त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात येणार असून बाईक रॅली देखील आयोजित करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

UPSC चा आणखी एक घोटाळा, मुख्य परीक्षेचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप!

SCROLL FOR NEXT