Corona Free Saam tv
महाराष्ट्र

आनंदाची बातमी..७३७ दिवसांनंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त

आनंदाची बातमी..७३७ दिवसांनंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दोन वर्षांपूर्वी २८ मार्च २०२० ला जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर तब्बल दोन वर्षे ७ दिवस अर्थात, ७३७ दिवसांनंतर जळगाव जिल्हा पूर्णत: कोरोनामुक्त झालाय. रविवारी जिल्ह्यात नवा एकही रुग्ण (Corona) सापडला नाही तर सक्रिय ४ रुग्णही बरे झाल्याने सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. (jalgaon news After 737 days Jalgaon district is free from corona)

दोन वर्षांपासून जगावर, भारतावर व पर्यायाने जळगाव (Jalgaon) जिल्ह्यावरही कोरोनाचे संकट आले. जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२०ला पहिला रुग्ण आढळून आला. हा रुग्ण खानदेशातील पहिला रुग्ण ठरला होता. त्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर असे चार- पाच महिने कोरोनाची पहिली लाट (Corona First Wave) तीव्र राहिली. ऑक्टोबरपासून जानेवारी २०२१पर्यंत रुग्णसंख्या कमी होत गेली. फेब्रुवारी ते मे २०२१ या काळात दुसरी लाट तीव्र झाली. या दोन्ही लाटांमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या दीड लाखापर्यंत पोचली. अडीच हजारांवर रुग्ण दगावले.

तिसऱ्या लाटेनंतर दिलासा

या वर्षीच्या सुरवातीला जानेवारीत तिसरी लाट सुरु झाली. मात्र, गेल्या वर्षभरातील लसीकरणामुळे ही लाट थोपवून धरली. अवघ्या महिनाभरात ती नियंत्रणात आली. गेल्या दीड महिन्यात तर एखाद- दुसरा नवीन रुग्ण आढळून येत होता. गेल्या ८-१० दिवसांपासून एकही रुग्ण समोर आला नाही. शनिवारपर्यंत जिल्ह्यात चार सक्रिय रुग्ण होते, तेदेखील बरे होऊन घरी गेले. त्यामुळे रविवारी जळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली.

सलग २८ दिवस नाही रुग्ण

रविवारी सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली असली तरी सलग २८ दिवस जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळून आला नाही. जिल्हा कोरोनामुक्त झाला, असे म्हणता येईल. सरकारने निर्बंध पूर्णपणे हटवले असले आणि मास्क सक्ती नसली तर नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी काही नियम स्वत:च पाळले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

आकडे बोलतात

२८ मार्च २०२० ते ३ एप्रिल २०२२

एकूण तपासणी : १७६११९९

एकूण बाधित : १५१५४१

एकूण कोरोनामुक्त : १४८९५०

एकूण मृत्यू : २५९१

बरे होण्याचे प्रमाण : ९८.१८%

मृत्यूदर : १.७१%

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT