Akola: मजुरीसाठी घेऊन जाणाऱ्या सहा बालकांची सुटका

Akola Child Labour News: या सर्व बालकांना शासकीय बालगृहात (Child Home) ठेवण्यात आले आहे.
The release of six child laborers from Akola railway station
The release of six child laborers from Akola railway stationजयेश गावंडे
Published On

अकोला: बनावट आधारकार्डच्या आधारे मजुरीसाठी घेऊन जात असलेल्या सहा अल्पवयीन बालकांची रेल्वे चाईल्ड लाईन (Railway Child Line) आणि लोहमार्ग पोलिसांनी (Railway Police) सुटका केलीय. या सर्व बालकांना शासकीय बालगृहात (Child Home) ठेवण्यात आले आहे. रेल्वे चाईल्ड लाईन समन्वयक पद्माकर सदांशिव यांच्यासह सदस्य अनिकेत गवई, एकता इंदोरे व भावना डोंगरे हे अकोला (Akola) रेल्वेस्थानकावर पाहणीसाठी फिरत असताना सदर सहा अल्पवयीन बालके रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर अज्ञात संशयित व्यक्ती समवेत आढळून आली. (The release of six child laborers from Akola railway station)

हे देखील पहा -

The release of six child laborers from Akola railway station
Bagad: नागनाथ देवाच्या यात्रेतील लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

या बालकांच्या काळजी व सुरक्षा हेतूने अज्ञात व्यक्तीची चौकशी केली असता, असे लक्षात आले की, बालकांच्या वयाचे पुरावे बनावट आधारकार्डच्या स्वरूपात तयार करून सदर व्यक्ती बालकांना फूस लावून काम करण्यासाठी घेऊन जात आहे. सदर माहिती अकोला लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या ठाणेदार अर्चना गाढवे आणि बालकल्याण समितीला देण्यात आली.

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सदर व्यक्तीला जीआरपी अधिकाऱ्यांकडे सोपवून बालकांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तसेच पुढील तपास करण्यासाठी या बालकांना बालगृहात ठेवण्यात यावे असे आदेश बालकल्याण समितीने दिले. त्यानुसार रेल्वे चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी जीआरपी अधिकाऱ्यांच्या मदतीने बालकांची कोविड तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी करून सदर सहा बालकांना शासकीय बालगृह अकोला येथे प्रवेशित केले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com