Jalgaon ZP Saam tv
महाराष्ट्र

Jalgoan: जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक; जि. प.वरही २१ मार्चपासून प्रशासक

जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर प्रशासक; जिल्हा परिषदेवरही २१ मार्चपासून प्रशासक

Rajesh Sonwane

जळगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत १३ मार्चला पूर्ण होत आहे. यामुळे १४ मार्चपासून १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहे. गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील. तर जिल्हा परिषदेची (Jalgoan ZP) पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्चला पूर्ण होत आहे. त्यावर २१ मार्चपासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) सूत्रे हाती घेतील. (jalgaon news Administrator on all Panchayat Samitis in the jalgoan district)

कोरोनाची (Corona) तिसरी लाट संपली असली तरी रुग्ण काही प्रमाणात आढळत आहेत. यामुळे या निवडणुका वेळेत होणार की लांबणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाने नुकतीच पालिका वॉर्डांची हद्दवाढ केली होती. त्यात पालिकांची वॉर्डसंख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने (Zilha Parishad) जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी झाली होती.

सप्टेंबरनंतरच निवडणूक

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलली जाणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १० गट वाढणार आहे. मात्र आरक्षणाबाबत सर्वच गटांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, नवीन इच्छुकांमध्येदेखील निवडणूक लढवायची की नाही याबाबत मोठा संभ्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT