Accident 
महाराष्ट्र

दुर्देवी..अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

दुर्देवी..अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव– भुसावळ दरम्‍यान राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ झालेल्‍या अपघातात सावदा येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज सकाळी घडली. (jalgaon-news-accident-news-national-highway-hit-by-unknown-vehicle-two-died-on-the-spot)

सावदा (ता. रावेर) येथील पाटीलपुरा परिसरातील रहिवासी राजेंद्र भादू डोळे (वय ४२) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय ५३) हे दोघेजण कामानिमित्त मोटार सायकलवरून जळगावला येत होते. दरम्यान, भुसावळच्‍या पुढे आल्‍यानंतर रेल्वे उड्डाण पुलाजवळ त्‍यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोघेजण जागीच ठार झाले.

दोन्‍ही परिवारांचा आक्रोश

सदर अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यानंतर अपघातातील मृतांचे मृतदेह जळगाव जिल्‍हा रूग्णालयात आणले.‍ येथे दोन्‍ही जणांच्‍या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची उसळली मोठी गर्दी

भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खायला दिली नाही, गिऱ्हाइकाची सटकली; पाणीपुरीवाल्यासोबत भयंकर घडलं

Accident: अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT