Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: सेवानिवृत्‍तीच्‍या दिवशीच गाठले मृत्‍यूने; सत्‍कारासाठी जाताना घडली दुर्घटना

सेवानिवृत्‍तीच्‍या दिवशीच गाठले मृत्‍यूने; सत्‍कारासाठी जाताना घडली दुर्घटना

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेंनन्स म्हणून तब्बल ३२ सेवा बजावली. मात्र सेवानिवृत्तीच्या दिवशी (Railway) रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली. सुरेश मोहन सोनवणे (वय ६०, रा. वाकीरोड, जामनेर) असे मयत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

जामनेर (Jamner) शहरातील वाकी रोड परिसरातील रहिवासी सुरेश मोहन सोनवणे हे रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांची सध्या पाचोरा येथे नियुक्ती होती. त्यांची ३१ मे रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या नोकरीतील शेवटचा दिवस होता. आज ते सेवानिवृत्त झाले. नियुक्ती असलेल्या पाचोरा (Pachora) येथील कार्यालयात सेवानिवृत्तीबद्दल सुरेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तर दुपारी भुसावळ येथे सेवानिवृत्त झालेल्या अन्‍य कर्मचाऱ्यांसोबत सुरेश सोनवणे यांचाही सत्कार होणार होता.

सत्कारासाठी सुरेश सोनवणे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावरुन काशी एक्स्प्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबाजवळ त्यांचा जखमी (Accident) अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सुरेश सोनवणे यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर हे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : फक्त १५ दिवसांत घरच्या घरी उगवा ताजी कोथिंबीर, फॉलो करा या भन्नाट टिप्स

Silk Saree Blouse Designs: सिल्क साडीवर शोभून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, डेली वेअरसाठी नक्की ट्राय करा

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण; आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Daily wear Mangalsutra Design: डेली वेअरसाठी 'हे' नाजूक आणि एलिग्नंट मंगळसूत्र डिझाईन, नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील चार नगरपरिषदाच्या दहा जागांसाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT