Suicide Help Saam tv
महाराष्ट्र

तारूण्यातील आत्‍महत्‍येचे प्रमाण ७० टक्‍के; २०२० मध्‍ये झाल्‍या सर्वाधिक आत्‍महत्‍या

तारूण्यातील आत्‍महत्‍येचे प्रमाण ७० टक्‍के; २०२० मध्‍ये झाल्‍या सर्वाधिक आत्‍महत्‍या

संजय महाजन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील २०१८ ते २१ या कालावधीत आत्महत्या केलेल्या लोकांचा अभ्यास करण्यात आला. यात धक्‍कादायक बाब म्‍हणजे जिल्‍ह्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये तरुण वर्गाचे प्रमाण सर्वात जास्त अर्थात ७० टक्‍के आढळून आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. (jalgaon news 70 Percentage youth suicide rate last four year)

जळगावमध्ये (Jalgaon) एकूण २०१८ ते २०२१ या कालावधीत १ हजार ९७५ आत्महत्या (Suicide) नोंदवण्यात आल्या. त्यात पाण्यात बुडून उंचावरून उडी घेऊन रेल्वेखाली, विषप्राशन, जळून, गळफास घेऊन धावत्या मोटार वाहन खाली व अन्य प्रकारात नस कापून अशा नोंदी आहे. या सर्वांमध्ये विविध गटांचा अभ्यास करण्यात आला. आत्महत्यांचे वर्गीकरण करताना अग्रेशन म्हणजे रागाच्या भरात व्यसनाधीनतेमुळे, शारीरिक आजाराला कंटाळून कर्जबाजारी झाल्यामुळे, आर्थिक अडचण, मानसिक आजाराने नैराश्यामुळे, कौटुंबिक संघर्ष, लग्न जमत नसल्यामुळे, अस्पष्ट कारणामुळे व अनैसर्गिक मृत्यू अशा वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सगळ्यात कमी ११ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या आहे. १६४ आत्महत्या या १८ वर्षाखालील बालकांच्या आहेत त्यात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. असून सर्वात जास्त ११ वर्षाच्या वयोवृद्धांनी ही आत्महत्या केलेली आहे

२०२० मध्‍ये सर्वाधिक आत्‍महत्‍या

जिल्‍ह्यात आत्‍महत्‍या करण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील चार वर्षांचा अभ्‍यास केल्‍यास सर्वाधिक आत्‍महत्‍या या कोरोनाच्‍या (Corona) पहिल्‍या लाटेत अर्थात २०२० मध्‍ये झाल्‍या आहेत. मात्र तुलनेत २०२१ मध्‍ये आत्‍महत्‍येचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. मागील चार वर्षातील २०१८ मध्‍ये ६९० आत्‍महत्‍या, २०१९ मध्‍ये ७१८ आत्‍महत्‍या, २०२० मध्‍ये ८१८ तर २०२१ मध्‍ये ७४९ आत्‍महत्‍या झाल्‍याची नोंद आहे.

जिल्‍हा पोलिसांतर्फे हेल्‍पलाईन

जळगाव पोलीस (Jalgaon Police) दल व श्री संतुलन कॉन्सिलिंग सेंटरतर्फे जळगाव जिल्‍ह्यातील आत्महतेच्या कारणावर अभ्यास करण्यात आला. जिल्‍ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संतुलन काउंसलिंग सेन्टरचे रागीब अहमद यांनी अभ्यास केला केला. डॉ. बालाजी राउत मु. जे. महाविद्यालय व धनश्याम रामटेके (NR) यांनी तांत्रिक सहकार्य केले. आत्महत्येचे प्रमाण वाढले असून यापासून नैराश्यग्रस्तांना परावृत्त करण्यासाठी जिल्हा पोलिसांतर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT