Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: किराणा दुकानातील नोकराने परस्‍पर विकला पावणे सहालाखांचा सामान

किराणा दुकानातील नोकराने परस्‍पर विकला पावणे सहालाखांचा सामान

Rajesh Sonwane

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील किराणा दुकानात कामाला असलेल्या नोकराने मागील माहिन्यात (Jalgaon News) चक्क ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा माल परस्पर विकून पैशांचा गैरव्यवहार केला. गुन्हा घडल्यापासून फरार संशयिताला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्याने (Crime) गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील जावई गल्लीत नंदकिशोर भागवत शिंदे (वय ४३) यांचे श्री समर्थ कृपा किराणा दुकान आहे. दुकानात विशाल शरद पाटील कामाला होता. ५ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान विशाल याने वेळावेळी किराणा दुकानातून तब्बल पाच लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून नेला व तो परस्पर विक्री केला. ही बाब लक्षात आल्यावर मालक भागवत शिंदे यांनी १४ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

संशयिताला अटक

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित फरारी झाला हेाता. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळालेल्या माहितीवरून इम्रान सय्यद, साईनाथ मुंडे, योगेश बारी, सुधीर साळवे यांनी विशाल पाटील याला पुण्यात अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड जप्त केली. त्यास जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश जे. एस. केळकर यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

Elephant Food: हत्ती काय खातो? तुम्हाला माहितीये का?

Honda N-One e: रेट्रो लूक...होंडाची नवीन N-One e कार, अल्टोपेक्षा लहान आणि खास वैशिष्ट्यांनी भरलेली

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार | VIDEO

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

SCROLL FOR NEXT