Hatnur Dam Water Saam Tv
महाराष्ट्र

Hatnur Dam Water : हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

Rajesh Sonwane

भुसावळ : तालुक्यातील हतनूर धरणांचे सर्व ४१ दरवाजे आज उघडले आहेत. मंगळवारी रात्री धरणाच्‍या पाणलोट (Hatnur Dam) क्षेत्रात पाऊस झाला. यानंतर आज सकाळपासून जिल्‍ह्यात पावसाची संततधार सुरू असल्‍याने धरणाच्‍या पाणी पातळीत (Bhusawal) वाढ झाल्‍याने आज दुपारच्‍या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. यामुळे तापी नदीला पुर आला आहे. (Live Marathi News)

जळगाव जिल्‍ह्यात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत २१०.५० मीटरने वाढ झाली आहे. एकूण साठा १९८ दलघमी असून हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने एकूण साठा ५१.०३ टक्‍के धरण भरले आहे. यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे सायंकाळी ५ वाजेला सद्यस्थितीत पाहून हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघण्यात आले आहेत.

नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणाचे दरवाजे उघण्यात आल्‍याने यातून ३८८२ क्युमेक्स १३७०९३ क्युसेक्स घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदी पात्रात (Rain) सोडण्यात आलेला आहे. यामुळे नदीला मोठा पुर आला आहे. नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तापी नदी पात्रात जाऊ नये तसेच गुरेढोरे व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच आवश्यक खबरदारी घेण्यात यावी; असे आवाहन प्रशासनाच्‍यावतीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: सुनील ग्रोव्हरनंतर कपिल शर्माचं किकू शारदासोबत बिनसलं? १३ वर्षांनंतर कॉमेडियनने सोडणार 'द कपिल शर्मा शो'; म्हणाला...

Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

SCROLL FOR NEXT