Electricity Theft Saam tv
महाराष्ट्र

Electricity Theft: तीन महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

तीन महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या (MSEDCL) भरारी पथकांनी एप्रिल ते जून २०२२ या तीन महिन्याच्या काळात (Jalgaon) वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाखांच्या २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. (Jalgaon News Power Theft MSEDCL Action)

वीजचोरी (Electricity Theft) व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अतिजलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्‍यानुसार सदर धडक मोहिम राबविली जात आहे.

५४ कोटी १६ लाखाची दंड वसूली

सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.

वर्षभरात १३ हजाराहून अधिक प्रकरणे उघडकीस

मागिल तीन आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरांवर अंकूश लावण्यात यश मिळविले असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ९२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरूध्द कारवाया करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ७१६९ एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३ हजार ३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी एवढी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT