Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave : जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट; तापमान पोहचले ४६ अंशावर, नंदुरबारच्या तापमानात वाढ

Jalgaon News : अगदी सकाळी दहा वाजल्या पासूनच उन्हाचे चटके जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत

Rajesh Sonwane

जळगाव : दरवर्षी उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान सर्वाधिक राहते. यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार उष्णतेच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात तर मागील तीन- चार दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून  जिल्ह्यात उच्चांकी ४६ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. 

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात गेल्या दोन- तीन दिवसांपासून सलग ४४ अंश तापमान राहिले. मात्र यात दोन अंशांनी वाढ होऊन पारा ४६ अंशांवर पोहचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. सूर्य जणूकाही आग ओकत असल्याचा अनुभव जळगावकरांना येत आहे. यामुळे अगदी सकाळी दहा वाजल्या पासूनच उन्हाचे चटके जाणवत असून रात्री उशिरापर्यंत (High Temperature) उन्हाच्या झळा जाणवत आहेत. परिमाणी दुपारच्या वेळी शहरातील रस्ते अगदी निर्मनुष्य होत आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यातही लाट
नंदुरबार
: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat Wave) पसरली आहे. तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अचानकपणे वाढलेल्या तापमानामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून तापमानाने गाठलेल्या विक्रमी पातळीच्या सर्वाधिक परिणाम हा जनजीवनावर होत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आगामी आठ दिवसात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने देण्यात आलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT