Jalgaon Municipal Election Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon Municipal Election: शिंदेंच्या उमेदवाराने जेलमधून जिंकली निवडणूक; माजी महापौर ललित कोल्हेंसह कुटुंबातील दोघेजण विजयी

Jalgaon Municipal Election Result 2026: जळगावच्या प्रभाग ११ मधून माजी महापौर ललित कोल्हेंचा विजय झाला आहे. त्यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती.

Siddhi Hande

आज राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत दिसत आहे. अशातच जळगावमध्ये एक अनोखा विजय झाला आहे. शिंदेसेनेचे ललित कोल्हे हे कारागृहातून विजय झाले आहेत. कोल्हे कुटुंबातील तिघेजण विजयी झाले आहेत.

जळगावमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट संघर्ष सुरु होता. यामध्ये आता माजी महापौर थेट जेलमधून निवडून आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघेजण विजयी झाले होते.ललित कोल्हे, पियुष कोल्हे अन् सिंधू कोल्हे विजयी झाले आहेत.

बोगस कॉल सेंटर प्रकरणी अटक

शिवसेना शिंदे गटाचे ललित माजी महापौर असलेले ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती. बोगस कॉल सेंटर प्रकरणांमध्ये ललित कोल्हे यांना अटक झाली होती. नाशिक कारागृहात आहेत. त्यांनी जेलमधून निवडणूक लढवली होती.ललित कोल्हे यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजय झाले आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये कोल्हे कुटुंबातील पिता पुत्राचा विजय झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

पिता-पुत्रांनी मिळवला विजय

पियुष कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून निवडणूक लढवली होती तर लिलत कोल्हे यांनी प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्याच कुटुंबातील सिंधू कोल्हे यांनीही विजय मिळवला आहे. पिता-पुत्राचा विजय शिवसेना शिंदे गटाचे नेते सरिता कोल्हे यांचे आनंदाश्रू अनावर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत भाजपची मोठी आगेकूच; गणेश नाईकांनी खोचक पोस्ट करत शिंदेंना डिवचलं|VIDEO

Vasai-Virar Result: वसई-विरारमध्ये भाजपला जोरदार झटका, वबिआची एकहाती सत्ता; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला

Blouse Design: सिंपल लूक दिसेल मॉडर्न, हे आहेत लेटेस्ट ब्लाऊजचे 5 पॅटर्न

Maharashtra Elections Result Live Update :पिंपरी चिंचवडमध्ये कोणाची सत्ता? वाचा आतापर्यंतचा निकाल

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT