Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Muktainagar News : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना म्हणाले, कि मी एकनाथ खडसेंकडे बघतच नाही. आता त्यांचं शिल्लक राहिलं काय? त्यांच्याकडे बघायची स्थिती राहिलेली नाही.

संजय महाजन

मुक्ताईनगर (जळगाव) : खडसे म्हणतायेत राजकारणाचा स्तर घसरत चाललाय. पण खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय. सार्वजनिक भाषणामध्ये अश्लील भाषणे तुम्ही केले. महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर घाणेरडा बोलणारे कोणी असेल तर ते एकनाथ खडसे आहेत; असा आरोप शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील केला आहे. 

शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकनाथ खडसेंवर निशाणा साधताना म्हणाले, कि मी एकनाथ खडसेंकडे बघतच नाही. आता त्यांचं शिल्लक राहिलं काय? त्यांच्याकडे बघायची स्थिती राहिलेली नाही. खडसे विषय माझ्यासाठी संपलेला आहे. महिला भगिनी संदर्भात खडसे (Eknath Khadse) मागे काय बोलले; या संदर्भात महाराष्ट्राला माहिती आहे; असेही ते म्हणाले.   

आमदार म्हणूनच इच्छुक 
आमदार म्हणूनच एवढा समाधानी आहे. मात्र कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो त्यांना वाटतं की आपला नेता मंत्री व्हायला पाहिजे. परंतु मी आमदार म्हणूनच इच्छुक आहे. मला मंत्री होण्याचे स्वप्न पडलेले नाही आणि माझी इच्छा पण नाही. मला संधी मिळाली तर मी आमदार होईल. एकाला मंत्री केला आणि आता दुसऱ्याला मंत्री करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे; असे म्हणत खडसेंचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे. पण मंत्री होण्याचे सोडा आता समोरच्याला ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होऊन खडसे कुटुंबियांनी दाखवावे; असेही आमदार पाटील म्हणाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT