Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News : भरधाव दुचाकी थेट पूर्णा नदीत कोसळली; एक जागीच ठार, एक जखमी

Purna River Bike Accident : मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसवले नाहीत. त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे.

Ruchika Jadhav

संजय जाधव

Jalgaon Jamod :

नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील मानेगाव येथे अपघाताची मोठी दुर्घटना समोर आली आहे. पूर्णा नदीच्या पुलावरून दुचाकी नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी आहे .

जवळपास 50 फूट खोल असलेल्या या पुलावरून भरधाव दुचाकी नदीत कोसळली. या पुलाला अनेक वर्षापासून संरक्षक कठडा नसल्याने अनेक अपघात घडले आहेत. मात्र अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाला कठडे बसवले नाहीत. त्यामुळे या धोकादायक पुलावरून अनेक प्रवासी वाहनांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल येथील रहिवासी करत आहेत.

ट्रक आणि दुचाकीचा आणखी एक भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या गरवारे कंपनी जवळ देखील काल अशीच अपघाताची घटना घडली होती. या अपघातात ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला.मात्र यामध्ये दुचाकीस्वाराची चूक नव्हती. एका भरधाव ट्रकने दुचाकी वरून जाणाऱ्यास पाठीमागून जोरदार धडक दिली. आय्युबखान पठाण राहणार मनीषानगर वाळूज असे मृत तरुणाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

Hair Cut: नवदीचा 'बॉब' हेअरकट पुन्हा ट्रेंडमध्ये; पाहा तुमच्या चेहऱ्यानुसार कोणता कट दिसेल परफेक्ट

SCROLL FOR NEXT