Jamner Accident Saam tv
महाराष्ट्र

Jamner Accident : भरधाव कारची दुचाकीला धडक; एक ठार, तीन गंभीर

Jalgaon News : जामनेर तालुक्यातील पहूर- सोनाळा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात गजा बारेला (वय २५, रा. ठाठर कमला, ता.जि. बऱ्हाणपूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे

Rajesh Sonwane

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहूर- सोनाळा रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात एकाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

जामनेर (Jamner) तालुक्यातील पहूर- सोनाळा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात गजा बारेला (वय २५, रा. ठाठर कमला, ता.जि. बऱ्हाणपूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील एका शेतकऱ्यांच्या शेतात गजा बारेला, त्याचा मोठा भाऊ अजय बारेला (वय ३०), लहान भाऊ राजू बारेला (वय २५), नातेवाईक दशरथ बहादूर बारेला (वय २०) हे सालदार म्हणून कामास होते. ते शेतातच वास्तव्यास होते. दरम्यान रविवारी पहूरचा बाजार असल्याने बाजारासाठी आले होते. बाजार झाल्यानंतर पहूर येथून दुपारी ते चौघे दुचाकीवर सोनाळा येथे परत निघाले होते. 

दरम्यान काही अंतरावर गेल्यानंतर कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या (Accident) अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. यामध्ये गजा बारेला याचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल (Jalgaon Medical Collage) केले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT