Gold Silver Rate Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon Gold-Silver: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दराने पुन्हा रचला इतिहास, सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी वाढ; वाचा आजचे दर

Gold Silver Rate: जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये पुन्हा सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडव्याला याठिकाणी तब्बल २५ कोटींची उलाढाल झाली. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्याच्या दराने उच्चांक गाठला.

Priya More

संजय महाजन, जळगाव

जळगावमध्ये इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेला आहे. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दर ९३ हजार रुपयांवर पोहचला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर २० ते २५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. आजही सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एकाच दिवसात सोने पुन्हा 800 रूपयांनी महाग झाले आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होऊन इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचा दर जळगावच्या सुवर्णनगरीत ९३ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर १ लाख ५ हजारांवर पोहचला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याला दीडपटीने मागणी राहिली. या मुहूर्तावर एकूण १७५ फर्ममध्ये २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. मात्र दोन्हीही मौल्यवान धातूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून सोने ९३ हजारांवर तर चांदी १ लाख ५ हजारांवर गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढले असले तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तामुळे सोने-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचे प्रमुख ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक सुवर्णनगरीमध्ये आले होते. मात्र सोन्याचा भाव वाढला असल्यामुळे गुढीपाडवा झाल्यावर सोन्याचा दर हा कमी होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे न होता आज ज्यावेळी सोने खरेदी करायला ते पुन्हा दुकानात आल्यावर त्यांना सोन्याचे दर वाढल्याचे दिसले. आज पण सोन्याचे दर ९३ हजारांवर गेले आहे. सोन्या- चांदीचे दर कुठेतरी कमी व्हावे अशी अपेक्षा महिला ग्राहकांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

GenZ Search Trends: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT