Entire family killed in electric shock accident in Jalgaon Maharashtra Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Maharashtra Jalgaon tragic rain accident : एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

  • जळगावच्या एरंडोल तालुक्यात पावसामुळे विजेच्या धक्क्याची दुर्घटना

  • एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू

  • मृतांमध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुले यांचा समावेश

  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला

  • घटना दुर्घटना की घातपात यावर अजूनही संशय

Entire family killed in electric shock accident in Jalgaon Maharashtra : राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जळगावमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

जळगावमधील एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लगान मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अख्ख्या कुटुंबाचा शॉक लागून मृत्यू झाला की घातपात होता? याची चर्चा जळगाव आणि एरंडोलमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामध्ये विजेच्या शॉक लागण्याची घटना घडलेली असू शकते असे दबक्या आवाजात बोलले जाते.

एरंडोल येथील वरखेडी शिवारज राहाणारे अख्खं कुटुंब विजेच्या शॉक लागून संपलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेतामध्ये असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या घरात हे कुटुंब राहात होते. पोलिसांनी तात्काळ पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी ही दुर्घटना आहे की आत्महत्या, हत्या याचा तपास घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT