Manasvi Choudhary
मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभिकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यांतील कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.Saam Tv
सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईचेच नव्हे तर देशातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांपैकी एक आहे.
देश-विदेशातून लाखो भाविक येथे मुंबईत सिद्धिविनायक दर्शनासाठी येतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. सिद्धिविनायक परिसराला पूर्णपणे नवे रूप मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर मंदिराच्या नव्या आराखड्याचे फोटो शेअर करत मंदिर परिसर नव्या रूपासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे.
सिद्धीविनायक मंदिराला सुमारे २२५ वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराची पायाभरणी १८०१ मध्ये लक्ष्मण पाटील आणि देहूबाई पाटील या दाम्पत्याने केली होती.
मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, येत्या काळात गर्दीचे व्यवस्थापन अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध केले जाणार आहे. अत्यंत कमी वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी प्रयत्न असणार आहेत.
मंदिर परिसरात एक विशेष कॉरिडॉर तयार करण्यात येत असून, यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी दुमजली पार्किंग यासारंख्या वेगवेगळ्या अद्ययावत व्यवस्था उभारल्या जातील.