Paan Skin Care : विड्याचं पान त्वचेसाठी वरदान; 'असा' करा वापर, उन्हानं काळवंडलेला चेहरा नव्याने चमकेल

Shreya Maskar

स्किन केअर

तुमच्या स्किन केअरमध्ये विड्याची पानांचा समावेश करा. पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे पिंपल्स, पुरळ आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

Skin Care | pinterest

विड्याची पानांचा फेस पॅक

विड्याची पानांचा फेस पॅक बनवण्यासाठी विड्याची पाने वाटून ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुम्ही त्यात दही, मुलतानी माती टाका. तुम्ही विड्याची पाने वाळवून त्याची पावडर बनवून साठवून ठेवा. ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा.

Betel Leaf Face Pack | pinterest

पद्धत

महिन्यातून दोन-तीन वेळा हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल. काळे डाग आणि पिंपल्स कमी होतील.

Method of Application | pinterest

विड्याची पाने

आंघोळीच्या पाण्यात विड्याची पाने १५-२० मिनिटे भिजवून ठेवा आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. खाज, त्वचेची ॲलर्जी आणि पुरळ यांसारख्या समस्यांवर खूप फायदेशीर आहे.

Betel Leaves for Bathing | pinterest

उजळ त्वचा

विड्याची पाने पाण्यात उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गाळून घ्या. प्रत्येक वेळी चेहरा धुण्यासाठी या पाण्याचा वापर करा. यामुळे तुमच्या त्वचेवरील सर्व जीवाणू नष्ट होतील आणि पिंपल्स येणार नाही.

Brighter Skin | pinterest

चमकदार त्वचा

विड्याच्या पानांमध्ये जिवाणूनाशक आणि त्वचा उजळवणारे घटक असतात, जे काळे डाग आणि व्रण हलके करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होतो.

Radiant Skin | pinterest

ॲलर्जी होत नाही

तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला अनेकदा लालसरपणा आणि पुरळ त्वचेवर येते. अशावेळी विड्याची पाने चेहऱ्यावर चोळा, यामुळे कोणताही संसर्ग होत नाही.

Prevents Allergies | pinterest

टीप

घरगुती कोणतेही प्रोडक्ट चेहऱ्यावर लावताना सर्वात आधी त्याची पॅच टेस्ट करा. कारण आपली त्वचा खूप संवेदनशील असते.

Note | pinterest

NEXT : पीरियड्समध्ये पिंपल्समुळे चेहरा खराब दिसतो, ट्राय करा 'हा' रामबाण उपाय रातोरात Pimples होतील गायब

Periods Skin Care | pinterest
येथे क्लिक करा...