Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: नावाचा गैरवापर होत असल्‍याचे सांगत फसवणूक

Cyber Fraud: नावाचा गैरवापर होत असल्‍याचे सांगत फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

Jalgaon News: मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलत असल्याची बतावणी करत नोकरदार तरुणीची ६९ हजार ५४९ रुपयात फसवणूक झाली. सदर प्रकार धरणगाव (Dharangaon) तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध फसवणूकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

धरणगाव तालुक्यातील नोकरदार तरुणीला तिच्या मोबाईलवर अज्ञात इसमाचा १८ मार्चला कॉल आला. सुरवातीला मुंबई येथून कुरिअर सेंडर मधून बोलत असल्याची बतावणी करत तुमच्या नावाचे कुरिअर आले असल्‍याचे तरुणीला सांगितले. कुरिअरवर अंधेरीचा पत्ता असल्याचे देखील समोरच्‍याने तरुणीला सांगितले. यास नकार देत आपण काहीही मागवले नसून त्‍यावरील पत्ता देखील आपला नसल्याची तरुणीने त्‍या अज्ञात व्यक्तीला सांगितले.

थोड्या वेळाने आला पुन्‍हा कॉल

सदर तरूणी पुन्‍हा फोन करून तुमच्या नावाचा कुणीतरी (Cyber Crime) गैरवापर करत असून तुम्हाला सायबर क्राईम ब्रॅंचसोबत संपर्क करुन देतो त्यांचे मार्गदर्शन घ्या असे म्हणत त्या व्यक्तीने सांगत फोन बंद केला. काही वेळाने अन्‍य मोबाईल क्रमांकावरुन तरुणीला फोन आला. मी मुंबई क्राईम ब्रॅंचमधून पोलिस बोलत असून तुमच्या नावाचा कुणीतरी गैरवापर करत असल्याचे आम्हाला दिसत असल्याची बतावणी केली. फोन सुरु असतांनाच तरुणीच्या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर एक लिंक पाठवली. त्‍यावर आधार कार्ड पाठविण्याचे सांगितले. यातून तरुणीला भिती दाखवत फसवणूकीच्या जाळ्यात फसवण्यास सुरुवात केली.

मनात घातली भिती

एक ना अनेक प्रकारची भिती आणि धमकी देत ९८ हजार ३२६ रुपयांची मागणी केली. कारवाईची भिती दाखवत आणि त्या भितीला व धमकीला बळी पडून तरुणीने त्यांना ती रक्कम पाठवली. नंतर त्या क्रमांकावर तरुणीने कॉल केला असता संपर्क बंद झाला. आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणीने धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT