Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे शिक्षकाला गंडविले; साडेसात लाख रुपयात फसवणूक

Jalgaon News : सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील यावल येथील माध्यमिक शिक्षक नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२) यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे

Rajesh Sonwane

जळगाव : वेगवेगळे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातच एका माध्यमिक शिक्षकाला ट्रेडींगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून ७ लाख ६२ हजार रुपयात फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील यावल येथील माध्यमिक शिक्षक नंदकिशोर दत्तू भारुडे (वय ५२) यांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. नंदकिशोर भारुडे याना ३० मार्चला फोन आला. यात त्यांना ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळण्याचे सांगण्यात आले. यासाठी एका अपॉर्चुनिटी ग्रुप मधून ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक अँप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले होते. 

परतावा देत केला विश्वास संपादन 

यानंतर सौजन्या गिल नामक एका महिलेने भारुडे यांना व्हिआयपी ६५ या व्हॉट्स अँप ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. तसेच वेगवेगळ्या ट्रेडींग ग्रुपमध्ये सहभागी करून अधिकचा नफा मिळेल असे सांगत आमिष देण्यात आले. त्यानुसार भारुडे यांनी सुरवातीला काही रक्कम गुंतविली. तर सायबर गुन्हेगारांनी भारुडे यांना सुरुवातीला भरलेले २ लाख रुपये त्यांना परत केले. यामुळे भारुडे यांचा विश्वास बसला.  

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 
रक्कम परत मिळाल्याने भारुडे यांनी वेगवेगळ्या बँक खात्यातून वेळोवेळो ७ लाख ६२ हजार रुपये ऑनलाईन भरले. मात्र, अनेक दिवस उलटून देखील गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा परतावा मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे भारुडे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात जाऊन सौजन्या गिल नामक महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT