Cyber fraud Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: तोतया सेनाधिकाऱ्याने डॉक्टरला गंडविले; क्रेडीट कार्ड-युपीआय कोडद्वारे सव्वा लाख लांबविले

तोतया सेनाधिकाऱ्याने डॉक्टरला गंडविले; क्रेडीट कार्ड-युपीआय कोडद्वारे सव्वा लाख लांबविले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील रहिवासी तथा होमियोपॅथी डॉक्टरांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने मी सेनाधिकारी (Cyber Crime) असल्याची बतावणी केली. आमच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा बहाणा करुन फी म्हणून पैसे देण्याचे सांगत क्रेडीट कार्डच्या युपीआय पीनद्वारे १ लाख २४ हजार ९९७ रुपयांत ऑनलाईन पद्धतीने गंडविल्याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांत (Police) गुन्हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

जळगावातील होमियेापॅथी तज्ज्ञ प्रमोद वसंत जोशी यांना रविवारी (२२ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास सतीश कुमार याने फोनवरून मी सेना अधिकारी असून, केंद्रीय विद्यालयात कार्यरत आहे. आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची तपासणी करायची आहे. प्रत्येक विद्यार्थी १५० रुपयांप्रमाणे आपल्याला फी पाठवत आहे. तुमच्या क्रेडीट कार्डवर पैसे येणार असून, तुम्ही पेटीएम ॲपवर जाऊन पिन रिसेट करण्यास सांगितले.

ऑनलाइन माहिती भरताच रक्‍कम गायब

संशयित सतीश कुमार याने सांगितल्याप्रमाणे डॉ. प्रमोद जोशी यांनी ऑनलाईन माहिती भरल्यावर त्यांच्या खात्यातून एक लाख २४ हजार रुपये संबंधिताच्या महिंद्रा कोटक बँकेच्या खात्यात वर्ग झाले. घडल्या प्रकरात फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. जोशी यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्‍हापेठ पोलिसांत पाठविण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सौरव दास आणि रंका यांची अखेर तुरुंगातून सुटका; ८ दिवसानंतर मिळाला जामीन

Aloe Vera Gel : रखरखीत त्वचा, मुरूम... रोज चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावता? मग फायदे आणि नुकसान आत्ताच घ्या जाणून

Diwali Sweet Safety : दिवाळीच्या मिठाईत भेसळ तर नाही ना? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने ओळखा

Walking With Music: चालताना गाणी ऐकावीत की शांतपणे चालावे? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

SCROLL FOR NEXT