Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : दुप्पट मोबदल्याची आमिष; तरुणाची पाच लाखात फसवणूक

Jalgaon News : काही दिवसांपूर्वी व्हॉटस्‌ॲप आणि टेलिग्रामवर दिव्या बस्सी नावाच्या तरुणीने संपर्क केला.

Rajesh Sonwane

जळगाव : वेगवेगळ्या कारणांनी सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक फसवणुकीचा प्रकार जळगावात समोर आला असून यात गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात दुप्पट फायदा होईल; असे आमिष दाखवत तरुणींनी एका तरुणाची ५ लाख २० हजार रुपयात फसवणूक केल्याचे समोर आले. 

जळगाव (Jalgaon) तालुक्यातील शिरसोली येथील शुभम दिलीप लांबोळे (वय २७) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम लांबोळे याला काही दिवसांपूर्वी व्हॉटस्‌ॲप आणि टेलिग्रामवर दिव्या बस्सी नावाच्या तरुणीने संपर्क केला. या तरुणीने शुभम यास गुंतवणुकीत दुप्पट आर्थिक फायद्याचे आमिष देत शुभमला ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगितले. तरुणीने सांगितल्यानुसार शुभम याने (Cyber Crime) गुंतवणुकीच्या दृष्टीने पैसे ट्रान्सफर केले. 

वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्याद्वारे ५ लाख २० हजार रुपये मागवून फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम लांबाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

Ajit Pawar death: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी, दादांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी व्यक्त केलं दुःख

SCROLL FOR NEXT