Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime: क्रेडीट लोनचे आमिष पडले महागात; सात लाख ६० हजारांत फसवणूक

क्रेडीट लोनचे आमिष पडले महागात; सात लाख ६० हजारांत फसवणूक

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : व्यक्तिक कर्जाचे आमीष देत मंगरुळ (ता. अमळनेर) येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची (Online Fraud) ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. (Live marathi News)

मिलिंद प्रकाश पाटील (वय २३, ह.मु. हिंजेवाडी, पुणे) याला बुधवारी (ता. १८ ) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यात पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड लोन देत असल्याचे बतावणी करण्यात आली. मिलिंद पाटील याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारला. नंबरच्‍या आधारे तरुणाच्या नावाने आलेल्‍या लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम, अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेला परस्पर ऑनलाईन परस्पर खात्यातून लंपास करून फसवणूक केली.

सायबर पोलिसांत गुन्हा

खात्यातून रक्कम लंपास झाल्याची माहिती कळाल्यावर शुक्रवारी (ता. २०) दुपारी सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी नंबरधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : गाड्या अडवल्या, बोनेटवर बसून धिंगाणा घातला; साताऱ्यात मद्यपी तरुणीचा धिंगाणा, Video व्हायरल

Sambhajinagar : धक्कादायक! समाज कल्याणच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT