Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे सांगत ३२ लाखांचा गंडा

Jalgaon News : २७ फेब्रुवारी ते ११ एप्रिलदरम्यान व्हॉटस्‌ॲप क्रमांकावरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले या नावाच्या दोघांनी संपर्क केला.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पैशांची गुंतवणूक करत त्याचा नफा घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र कधी कधी हा प्रयत्न फसतो आणि यात फसवणूक देखील होत असते. असाच प्रकार (Jalgaon) जळगावात समोर आला असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाने गृहस्थाला ३२ लाख ९ हजार ९९९ रुपयांना ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील कांचननगरात मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. मोहन सपकाळे यांना २७ फेब्रुवारी ते ११ एप्रिलदरम्यान व्हॉटस्‌ॲप क्रमांकावरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले या नावाच्या दोघांनी संपर्क केला. महिलेने मोहन सपकाळे यांना भूलथापा देत विश्वास (Cyber Crime) संपादन करून वेगवेगळ्या कंपनीचे शेअर खेरदी करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी के.एस. मीन या नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सपकाळे यांनी ॲप डाऊनलोड केले. त्या ॲपवर अभासी नफा मिळाल्याचे सांगून ३२ लाख ९ हजार ९९९ रुपये गुंतविले. शेअर बाजारात आपली गुंतवणूक झाली असून, त्यानुसार त्यांनी घेतलेल्या शेअरचे दर आणि परतावा मिळावा, यासाठी ते शोध घेत असतानाच त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. या नंतर त्यांनी जळगाव (Cyber Police) सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून श्वेता शेट्टी आणि अमोल आठवले असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक,राजस्थानहून आरोपी अटकेत

Mangalsutra Designs: पारंपारिक की मॉडर्न? लग्नासाठी मंगळसूत्राच्या कोणत्या डिझाईन शोभून दिसतील?

Tea and Biscuits Combo: चहासोबत बिस्किटं खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

PM Mudra Yojana: सरकारची खास योजना! कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार २० लाखांचे कर्ज; कोणाला होणार फायदा?

Samrat Choudhary: लाखोंची एफडी, कित्येक तोळा सोनं,भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT