जळगाव : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत जळगावातील एका महिलेची नऊ लाख ८२ हजारांची (Jalgaon) फसवणूक करण्यात आली. जळगाव सायबर पोलिसांत (Cyber Police) दाखल या गुन्ह्यात मुंबईच्या चेंबूर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)
जळगाव शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या दरम्यान वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकावरून (Cyber Crime) सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला. यात अपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो, असे सदर महिलेला सांगितले. महिलेने तयारी दर्शविल्याने त्यांनी महिलेला ॲपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली (Fraud) वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख ८२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -
दरम्यान अनेक दिवस होऊन देखील नफा आणि मुद्दल मिळाली नाही. यामुळे महिलेला शंका आली. यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्षनास आल्यावर त्यांनी १६ जानेवारीला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान पथकाने संशयित अशरफ उमर सय्यद (वय २६, रा. ह. मु. विष्णूनगर, म्हाडा वसाहत, चेंबूर) यास मुबई येथून २४ मार्चला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.