Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News : प्रेम प्रकरणाच्या संशयातून खून; ट्रकचालकाच्या खुनाचा उलगडा

Jalgaon News : प्रेम प्रकरणाच्या संशयातून खून; ट्रकचालकाच्या खुनाचा उलगडा

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगावच्या एमआयडीसी परिसरात गुरांच्या बाजाराजवळ असलेल्या ट्रान्सपोर्टवरील चालकांच्या आराम कक्षात (Jalgaon) झोपण्यासाठी गेलेल्या एका चालकाचा खून झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर चोविस तासांतच खुनाचा (Crime News) उलगडा झाला असून, प्रेम प्रकारच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Tajya Batmya)

मालदाभाडी (ता. जामनेर) येथील सागर रमेश पालवे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. सागर हा विकास लकडे यांच्या विदर्भ ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कामाला होता. दरम्यान ८ सप्टेंबरला सकाळी त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ धाव घेत माहिती घेतली. त्यात, आदल्या दिवशी परिसरातील नवीन गुरांच्या बाजाराजवळ त्याचा काही लोकांसोबत वाद झाल्याचे समजले. 

प्रेम संबधाचा संशय
मृत सागर हा एका मुलीसोबत सतत बोलत असे. याच रागातून त्याच्यासोबत काम करणारे ज्ञानेश्‍वर ऊर्फ पिंटू ब्रिजलाल बोदडे (वय ४०, रा. अष्टमी कॉलनी, मुक्ताईनगर) व निलेश रोहिदास गुळवे (वय २२, रा. रामेश्‍वर कॉलनी) यांच्याशी वाद झाला. घटनेच्या रात्री याच दोघांनी सागरला बेदम मारहाण केल्याने सागरचा मृत्यू झाल्याने दोघांनी पळ काढला. त्याच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा आणि रक्त निघत असल्याने त्यास तातडीने जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषीत केले. सागरची आई निलम पालवे यांनी जळगावी पोचल्यावर सागरचा मृतदेह दिसताच हंबरडा फोडत आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT