Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: भर चौकात व्यापाऱ्याला लूटले; ८ लाखांची रोकड घेवुन झाले पसार

भर चौकात व्यापाऱ्याला लूटले; ८ लाखांची रोकड घेवुन झाले पसार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन ईश्वर मेघाणी (सिंधी कॉलनी) घराकडे निघाले होते. या ड्रायफ्रुट व्यापाऱ्याकडे असलेली आठ लाखांची रोकडची बॅग ट्रिपलसीट भामट्यांनी हिसकावून (Robbery) पसार झाले. जिल्‍हापेठ पोलिसांत (Police) या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Live Marathi News)

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायपूटचे व्यापारी आहे. यांचे दाणा बाजार येथे दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवार (ता.२३) त्यांनी आठ लाख रूपयांची रक्कम बॅगेत ठेवली होती. पण, बँकेत भरणा करता न आल्याने सदर रक्कम रात्री दुकान बंद केल्यावर दुचाकीने घराकडे निघाले होते. राधाकृष्ण मंगल कार्यालायाजवळील गणेशवाडीकडे वळण घेतांना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या दोघांनी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून पुर्वीपासुनच दुचाकी सुरु ठेवुन तयारीतच असलेल्या भामट्यासोबत पोबारा केला.

दूरपर्यंत केला पाठलाग

मेघाणी यांची बॅग हिसकावल्यावर मेघाणी यांनी आरडा ओरड केल्यावर त्यांच्या मागून आलेले अमर कारडा यांच्यासह त्यांनी त्या चोरट्याचा पिच्छा केला. मात्र, सुसाट वेगात हे भामटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. चोरट्यांनी पळवून नेलेल्या बॅगेत मेघाणी यांचा लॅपटॉपसह, मोबाईल फोन होता. त्याच्याद्वारे संशयीतांचा तांत्रिक शोध सुरु असतांना राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावापर्यंत मोबाईल सुरु होता. मात्र, यानंतर बंद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

Marathwada Floods : बँकांनीही आवळला शेतकऱ्याभोवती फास; सरकारी बँकांचा, सावकारी कारभार, VIDEO

SCROLL FOR NEXT