Chalisgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

Jalgaon News ;लक्ष्मण राठोड यांनी चाळीसगाव येथील चोलामंडल बॅंकेतून एक लाख ९० हजारांचे गृहकर्ज घेतले. कर्जाची रक्कम राठोड यांच्या ॲक्सिस बॅंकेच्या खात्यात वर्ग केली होती

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : शहरातील गणेश रोडवरील गणेश कॉम्प्लेक्समध्ये तळोंदा प्र. चा. (ता. चाळीसगाव) येथील मोटार रिवाईंडिंग करणाऱ्या दुकानदाराची एक लाख ९० हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविली. ही घटना सोमवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील तळोंदा प्र. चा. येथील मोटार रिवाईंडिंगचे काम करणारे अशोक लक्ष्मण राठोड यांनी चाळीसगाव येथील चोलामंडल बॅंकेतून एक लाख ९० हजारांचे गृहकर्ज घेतले. कर्जाची रक्कम राठोड यांच्या ॲक्सिस बॅंकेच्या खात्यात वर्ग केली होती. ही रक्कम त्यांनी सोमवारी दुपारी काढून पिशवीत ठेवली. यानंतर ते कामानिमित्त दुचाकीने कॉम्प्लेक्समध्ये आले. काम आटोपल्यानंतर त्यांनी पैशांची पिशवी दुचाकीच्या अडकवली आणि त्याचदरम्यान चोरट्याने (Crime News) ती लंपास केली. 

पिशवी दुचाकीला नसल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक राठोड यांनी शोधाशोध केली. मात्र पिशवी सापडून न आल्याने या घडल्या प्रकाराची माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिली. यानंतर पोलिसांचे पथकाने कॉम्प्लेक्समधील काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर ज्या बॅंकेतून अशोक राठोड यांनी पैसे काढले होते, त्या बॅंकेतील सीसीटीव्हीही तपासले. मात्र, उशिरापर्यंत चोरट्याचा शोध लागला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT