Jalgaon Crime News
Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime News: धक्‍कादायक..सोळावर्षीय मुलीवर दबाव टाकून अनैतिक कृत्यास पाडले भाग

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन बालिकेला वेगवेगळ्या अनोळखी लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास दबाव टाकून अत्याचार (Jalgaon News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात दाखल या गुन्ह्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जळगाव शहरातील एका भागात वास्‍तव्‍यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही परिवारासह वास्तव्यास आहे. गेल्‍या महिन्‍यात ७ जानेवारीला नितू उर्फ जोया राजू बागडे (रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार (दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलाविले. यानंतर तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले.

त्यानंतर पुन्हा १० तारखेला कपडे व मोबाईल घेवुन देण्याचे आमिष दाखवत चाळीसगावला घेवून गेले. तिथे २३ फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री पुन्हा सोड्यात नशेचे द्रव्य पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. पोलीस येणार असल्याचे सांगून तिघांनी तिला रेल्वेत बसवून जळगावला पाठविले. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा सगळा प्रकार आईला सांगितले. पिडीत मुलीने आईसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितू उर्फ जोया राजू बागडे (रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार (दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Pune Bus Fire: पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव! धावती बस पेटली, जळून झाला कोळसा

IPL 2024: गुटख्याच्या पुडीने नाणेफेकचा सराव करावा! १० वेळा टॉस गमवणाऱ्या ऋतुराजची दिग्गज माजी क्रिकेटर घेतली फिरकी

SCROLL FOR NEXT