Saam Impact News: शेतकऱ्याला दिला दोन रुपयाचा चेक; व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द

शेतकऱ्याला दिला दोन रुपयाचा चेक; व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द
Saam Impact News
Saam Impact NewsSaam tv

सोलापूर : शेतकरी शेतात राबराब राबुन मोठ्या कष्टाने पिकवलेल्या ५१२ किलो कांद्याचे फक्त २ रुपये पदरात पडले. तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असाच प्रकार (Solapur News) सोलापूर बाजार समितीत झाला. शेतकऱ्याला (Farmer) चक्‍क दोन रूपयांचा चेक देवून थट्टाच केली होती. याबाबत ‘साम टीव्‍ही’ने बातमी लावल्‍यानंतर व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द केला आहे. (Breaking Marathi News)

Saam Impact News
Jalgaon News: कापसाला १३ हजार हमीभावसह सबसिडी द्या; महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्‍ता रोको

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव (झाडी) या गावातील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या २ एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. कांद्यातून (Onion) मिळालेल्या पैशातून आपल्यावर असलेले देणे सारू असं या उद्देशातून राजेंद्र चव्हाण यांनी भाव कमी असल्याने दहा पोते कांदा १७ फेब्रुवारीला सोलापूरमधील सुर्या ट्रेडर्स यांच्याकडे घेऊन गेले. १० पोते कांद्याचे वजन ५१२ किलो झाले. मात्र कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रतिकिलो १ रुपयाप्रमाणे भाव मिळाला. वाहनभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले.

नोटीसीनंतर परवाना रद्द

साम टीव्हीने ही बातमी लावून धरली. अखेर नसीर खलिफा या व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द झाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने (Bajar Samiti) या संदर्भात सूर्या ट्रेडिंगला खुलासा करण्याची नोटीस जारी केली होती. मात्र समाधानकारक खुलासा न मिळाल्याने सोलापूर कृषी उत्पन्न समितीने कांदा व्यापाऱ्याचा परवाना २४ फेब्रुवारीपासून पुढील पंधरा दिवसांसाठी रद्द केला आहे.

शेतकऱ्याचा आत्‍मदहनाचा इशारा

कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक राजेंद्र चव्हाण यांच्या नावे दिला. चेकची तारीख ८ मार्च २०२३ दिल्याने संताप व्यक्त करत असून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा हे या शेतकऱ्याने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com