Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : सोशल मीडियावरून मैत्री; भेटायला बोलावून नेले रूमवर, तरुणीवर अत्याचार

Jalgaon News : तरुणी गुरुवारी जळगावी आली. बस स्थानकावर तरुणी पोहोचल्यानंतर अमोल देखील तेथे आला. यानंतर तरुणीला बसस्थानकावरून दुचाकीवरून जळगावातील शिव कॉलनीतील त्याचा मित्राच्या घरी घेऊन गेला

Rajesh Sonwane

जळगाव : सोशल मीडियावरून मैत्री करत फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तर याच ओळखीतून प्रेमाच्या आणाभाका घेत यातून गैरप्रकार झाल्याचे देखील घडले आहेत. असाच प्रकार जळगावमध्ये समोर आला असून इंस्टाग्रामवरून ओळख झाली. यातून मैत्री वाढली असता तरुणीला भेटायला बोलावत तिला एका रुमवर घेऊन गेला. यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी येथील तरुण अमोल राठोड याची शिरपूर तालुक्यातील एका तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. या ओळखीतून दोघेजण चॅटिंग करत बोलू लागले होते. यामुळे मैत्री अधिक घट्ट झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच तरुणाने तरुणीचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने तरुणीला भेटण्यासाठी जळगावला बोलावले. 

तरुणाने सांगितल्यानुसार १० जुलैला अमोलने त्याच्या मैत्रिणीला जळगावला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार तरुणी देखील गुरुवारी जळगावी आली. बस स्थानकावर तरुणी पोहोचल्यानंतर अमोल देखील तेथे आला. यानंतर तरुणीला बसस्थानकावरून दुचाकीवरून जळगावातील शिव कॉलनीतील त्याचा मित्राच्या घरी घेऊन गेला. तर याच परिसरात अमोल याने देखील भाड्याने खोली केलेली होती. त्याठिकाणी तरुणीला घेऊन गेला. 

पोलिसात गुन्हा दाखल 

भाड्याने घेतलेल्या खोलीवर घेऊन जात अमोलने तरुणीवर अत्याचार केला. दरम्यान पीडितेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला असता कुटुंबीय हादरले होते. यानंतर त्यांनी जळगावी येत दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अमोल सवयलाल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक संजय तडवी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT