Jalgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: दागिने पॉलिश करण्याचा बहाणा; मंगळसुत्र, सोन्याचे टोंगल केले लंपास

दागिने पॉलिश करण्याचा बहाणा; मंगळसुत्र, सोन्याचे टोंगल केले लंपास

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र आणि (Gold) सोन्याचे टोंगल असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार तालुक्यातील किनगाव येथे घडला आहे. याप्रकरणी येथील (Police) पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News Fraud)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार (Yawal) यावल तालुक्यातील किनगाव बु. येथे राहणाऱ्या प्रमिला नामदेव देवरे (वय ५७) ही महिला पतीसह वास्तव्याला आहे. बुधवारी (१४ सप्‍टेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई घरी एकटी असतांना दोन अनोळखी तरूण त्यांच्या घराच्या ओट्यावर बसले. त्यावेळी प्रमिलाबाई या घरात स्वयंपाक करत होत्या. दोघांनी महिलेला आवाज दिला. आमच्याकडे तांबे, पितळाचे भांडे चमकविण्याची पावडर आहे. त्यानुसार महिलेने घरात तांब्याचा तांब्या आणून पॉलीश करण्यासाठी दिला. चोरट्यांनी पावडर लावून तांब्या चमकावून दिला.

मग मागितले सोन्‍याचे दागिने

त्यानंतर आम्ही सोन्याचे दागिने देखील पॉलिश करून देतो; असे सांगितल्याने महिलेने त्याच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत आणि टोंगल काढून चमकवण्यासाठी दिले. थोड्यावेळाने तुमचे काम झाले असून एक स्टीलचा डबा घ्या. त्यात हळद व पाणी टाका, गॅस चालू करा आणि तो डबा गॅसवर ठेवा, असे सांगून काही कळण्याच्या आत दोन्ही भामट्यांनी ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाले.

डबा उघडल्‍यावर बसला धक्‍का

इकडे महिलेने डबा उघडल्यानंतर त्यात दागिने नसल्याचे दिसून आल्याने त्यांना धक्काच बसला. महिलेने येथील पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. नरेन्द्र बागुले व पोलीस करीत आहे. नागरीकांनी अशा प्रकारे कृत करून महीलांची फसवणुक करणाऱ्या भामट्यांपासुन सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Live : भाऊबि‍जेला कट रचला, मनोज जरांगेंनी वाल्मिक कराड, पंकजा मुंडेंचेही नाव घेतलं, नेमकं काय काय म्हणाले?

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Maharashtra Live News Update: धनंजय मुंडेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Black Pav Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी स्पेशल ब्लॅक पावभाजी; वाचा सोपी रेसिपी

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

SCROLL FOR NEXT